न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- चिंचवड येथील इंजिनीअरिंग क्लस्टर येथे मोफत सीएनसी ऑपरेटर टर्निंग प्रशिक्षण वर्ग २० एप्रिल पासून सुरू होत आहे.
इच्छुकांनी या सीएनसी ऑपरेटर टर्निंग प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी इंजिनिअरिंग क्लस्टर सेंटर, प्लॉट क्र. ५१, डी -१ ब्लॉक, एमआयडीसी, चिंचवड बर्ड व्हॅली गार्डन समोर पुणे – ४११०१९. मो. ९५९५७१५७०२ / ९६०७६७७३३४ / ७५०७८४३००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने करण्यात आले आहे.
हा प्रशिक्षण उपक्रम पुर्णतः निशुल्क आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट १८ ते ४५ वर्षे आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास यांचे प्रमाणपत्र प्राप्त होईल.
















