न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- जैन सोशन गु्रप डायमंड या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने भगवान महावीर जयंती यांचे औचित्य साधून कामशेत ते चिंचवड अहिंसा दौड संपन्न झाली. सभासदांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सप्ताह निमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. सायली पवार व डॉ. विजय पवार यांनी तपासणी केली मोफत औषध वाटण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘प्रभू महावीर जन्म कल्याण’ नाटीका सादर करण्यात आली. त्यात जैन सोशल गु्रप डायमंडमधील 75 हून अधिक हौशी कलाकारांनी सहभाग नोंदविला. नाटीकाचे लेखन व संयोजन डॉ. क्षितीजा गांधी यांनी केले.
महावीर जयंती निमित्त आयोजित सप्ताहाचे डायमंड गु्रपचे अध्यक्ष प्रशांत गांधी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सप्ताहानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आदी भागातील जैन संघटनेतील पदाधिकारी व सभासदांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रमासाठी जैन सोशल गु्रप डायमंड पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष प्रशांत गांधी, पदाधिकारी राजेंद्र धोका, दिलीप मेहता, हसमुख जैन, दिलीप चोरबेले, युवराज शाह, चंचला कुचेरिया, सौरभ शहा, धवल पटेल, कमलेश चोपडा, सुनिता धोका आदींनी विशेष परिश्रम घेतले.
















