न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- माझ्याशी चॅटींग करते तसेच विवस्त्र व्हिडीओ ऑनलाईन व्हॉयरल करील, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. फिर्यादीची इच्छा नसताना बळजबरीने फिर्यादीसोबत त्याने शरीरसंबंध निर्माण केले. तीन ठिकाणच्या लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसेच फिर्यादीला वारंवार शिवीगाळ व धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यत घडला. महिला फिर्यादीने आरोपी राहुल रामभाउ लांडगे (वय ४२ वर्षे, रा. बोपखेल) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलीसांनी १८१/२०२३ भादवी कलम ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.