- वाल्हेकरवाडी आणि सांगवीतील चार गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांवर कारवाई सुरु आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट २ कडुन वाहनचोरांचा शोध सुरु होता. दरम्यान दोन घटनेत दुचाकी व रिक्षा चोरणाऱ्या चोरटयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोरश्वर कॉलनी, चिंचवडेनगर येथे गाडी मालकाने शाईन नावाची दुचाकी घरासमोर पार्क करुन ठेवली होती. चोरीस गेल्याचे त्याच्या लक्षात आले त्यांनी गाडी चोरीची तक्रार चिंचवड पोलीस स्टेशन येथे दि. १६/०४/२०२३ रोजी दिली होती. सकाळी द्चाकी चोरीला गेली होती. चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सी.सी.टी.व्हि. कॅमेरेद्वारा दुचाकीचोराचा पोलिसांनी माग काढला. आरोपीला पोलिसांच्या पथकाने सापळा रचुन ताब्यात घेतले. दिनेश मलकारी इंगळे (वय २८ वर्षे, वाल्हेकरवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तो राहत असलेल्या घराच्या पाकींगमध्ये चोरलेली शाईन आणि मध्यरात्री लिंकरोड चिंचवड येथील रेल्वे ट्रॅक जवळील इमारतीच्या पार्कींगमधुन हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन्ही गाड्या पाकींगमध्ये पार्क केल्याचे ठिकाण दाखविले. आरोपीकडुन ६०,००० रुपये किमतीच्या २ दुचाकी जप्त करुन २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चार दिवसापुर्वी मल्हार गार्डन, नवी सांगवी येथुन एक बजाज ऑटो कंपनीची रीक्षा चोरल्याचे सांगितले. तसेच एक हीरो होंडा कंपनीची पॅशन दुचाकी ही टाटा मोटर्स कंपनी, पिंपरी येथिल पार्कींग मधुन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ रीक्षा व १ दुचाकी असा एकुण १,६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट २ कडुन दोन वेगवेगळया कारवायामधुन ३ दुचाकी व १ रिक्षा अशी एकूण २,२५,००० रुपये किमतीची ४ वाहने जप्त करुन एकुण ४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
ही कारवाई स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप-निरीक्षक गणेश माने, पोहवा प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, पोना देवा राऊत, सागर अवसरे, सपोफो शिवानंद स्वामी, केराया माने, दिलीप चौधरी, पोना १९२३ आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस शिपाई शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांच्या पथकाने केली