न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- व्हिनस डेटा प्रा. लि, चिंचवड या अॅपल स्टोअरमध्ये आरोपी आला. त्याने जुना फोन एक्सचेंज करून नवीन दोन मोबाईल खरेदी केले. पुन्हा ४ नवीन आयफोन खरेदी केले. त्या नवीन मोबाईल खरेदीची रक्कम फिर्यादीच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये एन.एफ.टी. ऑनलाईनव्दारे केल्याचे भासवीत एकुण ५,९९,६०० रुपये पाठविल्याचा खोटा स्किन शॉट दाखवून फिर्यादीची फसवणुक केली. चार मोबाईल फोन घेवून फिर्यादीचा विश्वासघात केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी १२.३० ते ५.३० च्या दरम्यान घडला. फिर्यादी सुशांत सुनिल गुजर (वय-३६ वर्षे, लोहगाव, पुणे) यांनी आरोपी संजय सार्थक (मो. नं. ९७७८९४४४४४, ई-मेल आयडी-/sanjaysarthak 1996 @gmail.com) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १८२/२०२३ भादविकलम ४०६, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चेकलम ४३, ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.