न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी आरोपीला हद्दपार केले आहे. असे असताना देखील आरोपीने पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला.
बेकायदा धारदार लोखंडी सत्तुर हत्यार जवळ बाळगला. गुन्हे शाखा युनिट -२ च्या पोलिसांनी (दि. २३) रोजी सायंकाळी ६.५५ वाजता भाटनगर, पिंपरी येथील बिल्डींग नंबर ५ व सरकारी दवाखाना समोरील मोकळया जागेत कारवाई केली.
विनोद गणेश जाधव (वय २४ वर्षे, रा. संत निरंकारी भवनामागे, बालाजीनगर झोपडपटी, एमआयडीसी, भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिपरी पोलिसांनी ४७१ /२०२३ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.