न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- रावेत येथील फिर्यादीचा २ गुंठ्याचा प्लॉट बळकाविणेच्या उद्देशाने फिर्यादीच्या शेजारील प्लॉटधारकांच्या खरेदी दस्तांमधील चतुः सिमांमध्ये फिर्यादीचं नाव असतानाही जाणिवपुर्वक कट रचला. बनावट दस्तऐवज तयार करुन तो नोंदवुन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीच्या प्लॉटवर बेकायदेशीरपणे प्रवेश केला. प्लॉटच्या कंपाऊंडमधील ५०,००० रुपयांचे सिमेंटच्या पोलची चोरी केले. फिर्यादीच्या प्लॉटवर पत्र्याचे कंपाऊंड मारुन अतिक्रमण करुन बनावट दस्तऐवजाच्या आधारे फिर्यादीचा अंदाजे ५०,००,००० रुपये किंमतीचा प्लॉट बळकावला. फिर्यादीस व त्यांच्या कुटुंबास शिवीगाळ करुन प्लॉटवर पाऊल ठेवल्यास जिवे मारुन त्याच प्लॉटमध्ये गाडुन टाकण्याची व खंडणीसारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २३/०५/२०२२ रोजी ०९.०० पुर्वी ते दि. २८/०४/२०२३ रोजी ११.०० पर्यंत रावेतमधील फिर्यादीच्या २ गुंठे जागेवर घडली.
महिला फिर्यादीने सुनिलकुमार विनोदभाई पटेल, राजेशकमार विनोदभाई पटेल, नरेशकुमार रवजीभाई पटेल, सतीशकुमार रवजीभाई पटेल, अल्पेश अरविंदभाई पटेल व इतर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी २०० / २०२३ भा.द.वी. स. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४४७, ३७९, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.