न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- ‘आम्ही तुमच्या मुलीवर जहांगीर हॉस्पिटल येथे केलेले उपचाराचे तीन लाख रुपये दया’, अशी मागणी आरोपींनी फिर्यादीकडे केली. फिर्यादीच्या आईने त्यांच्या आरोपी जावयाचे बाहेरील मुलींसोबत असणारे अनैतिक संबंधाचे फोटो दाखवीले. त्यावरून फिर्यादी व त्यांच्या आईला आरोपी यांनी घरात जावुन शिवीगाळ, हाताने मारहाण केली.
फिर्यादीचा देवर आरोपीने फिर्यादीला उद्देशुन ‘तू आमच्या सर्वांसमोर माझ्या भावाचे अश्लिल फोटो दाखवते का?’ असे म्हणत फिर्यादीच्या आईसमोर अश्लिल कृती करीत ‘आता तुझे व माझे फोटो काढुन सर्वाना दाखवु का? तु तुझ्या मोबाईलमध्ये असलेले माझ्या भावाचे फोटो डीलीट कर, नाहीतर मी तुझा लहान भावाला जिवंत ठेवणार नाही. पाहु तुम्ही उदया त्याचा कसा साखरपुडा करता ते’, अशी धमकी देत तो तिथून निघुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २७) रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास मोरवाडी, पिंपरी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी सलिम उस्मान पठाण, देवर जावेद उस्मान पठाण, महिला आरोपी, महिला आरोपी, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४८० / २०२३ भा. दं.वि कलम ४५२, ३५४, ३५४,१४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.