न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- भक्ती शक्ती शिल्पाशेजारील ऐतिहासिक व धार्मिक वारसा असणाऱ्या शिवतीर्थ मैदानाचे व्यापारीकरण करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न पीएमआरडीए प्रशासनाकडून सुरु आहे.
प्रशासनाच्या निषेधार्थ व शिवतीर्थ मैदानाच्या समर्थनार्थ भक्ती शक्ती उद्यान येथे दोन दिवस स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शहरातील अनेक पक्षांचे नगरसेवक, सामाजिक संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.
या मोहिमेचे नियोजन भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे अभिषेक म्हसे, सागर तापकीर, जीवन बोराडे, सचिन ढोबळे, अक्षय कारंडे, अतुल वरपे, भावेश काचा, हेमंत शिर्के, प्रसाद फिरोदिया, प्रतीक इंगळे, जालिंदर काटकर, गौरव सुर्यवंशी आदींनी केले होते. समितीच्या वतीने पीएमआरडीए कार्यालयासमोर लवकरच मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे, असे समितीचे जीवन बोराडे यांनी सांगितले.