न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- वाल्हेकरवाडी रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी पार्क व लॉक करुन ठेवली होती. अज्ञात चोरटयाने ती गाडी चोरून नेली आहे.
गाडीची किमत दोन लाख रुपये एवढी आहे. ही घटना (दि. २८ रोजी रात्री ८. ०० ते दि. ३०/०४/२०२३) रोजी घडली.
फिर्यादी धनंजय गुंळुजकर यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २०२/२०२३ भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.