न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन आरोपी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांची गचंडी पकडून एकमेकांशी मारामारी करीत झोंबाझोंबी केली. मोठमोठयाने आरडा-ओरडा करुन शिवीगाळ करीत गर्दी करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला.
हा प्रकार (दि.३०/०४/२०२३) रोजी रात्री ८.१५ वाजता गवळीनगर, गोरे हॉस्पीटल, भोसरी येथे घडला.
भोसरी पोलिसांनी अमर रमेश डोळस (रा. दिघीरोड, भोसरी), यश मोहन निकम (रा. संत तुकारामनगर, भोसरी), राहूल चंद्रकांत मोरे (संत तुकारामनगर, भोसरी),यांच्यावर ३९०/२०२३ भा.दं.वि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















