न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- पुर्व नियोजीत कट रचून फिर्यादीच्या वाकड येथील प्लॉटचे नुकसान केले. हातात कोयता, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड घेवुन फिर्यादी व त्यांच्या कामगाराला मारहाण केली. तसेच बेकायदेशीर कागदपत्राच्या आधारे दुरुपयोग करुन आर्थिक फायदा घेतला.
फिर्यादी यांचे डॉक्युमेंट टायटल क्लिअर असताना देखील बळजबरी त्यांच्या प्लॉटवर जबरदस्तीने ताबा मिळवण्यासाठी दोघांच्या नावाचे बेकायदेशीर १०० रुपयाच्या स्टॅम्पवर (दि. ०७/०७/२०२१) रोजी खरेदीखत तयार कले. दुस-याच जागेचे नोटरी डॉक्युमेंट त्यावर खोटया सह्या करून खोटे कागदपत्र खरे म्हणुन वापरुन व ही जागा तीच आहे, असे भासवुन आरोपींनी फिर्यादीच्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न करीत बनावट कागदपत्राच्या आधारावर फिर्यादी यांची आहे, म्हणुन फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०५/०१/२०२३ आणि दि. २०/०३/२०२३) रोजी सायं ६.१५ ते ६.३० च्या दरम्यान वाकड येथे घडली.
फिर्यादी सुरेश चंदूलाला होळकर (रा. आटफाटा, बारामती) यांनी आरोपी सचिन नागटिळक, पोपट पांडु राजिवडे, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी व सुन तसेच त्यांचे सहकारी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ५८०/२०२३ भा.दं.वि. कलम ३४२,३२४,३२३, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


















