न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- पेट्रोलपंप डिलरशीपबाबत जाहिरात दिली. सदरची वेबसाईट हुबेहुब सरकारी वेबसाईट असल्याचे भासवले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने क्यु.आर.कोड स्कॅन करण्यास भाग पाडून फिर्यादीच्या खात्यातून १,७५,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १८/०३/२३ ते दि. २८/०३/२३) दरम्यान इंदिरानगर, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी उमेश महालिंग स्वामी (चिंचवड) यांनी आरोपी www.petrolpumpksk.com वेबसाईट धारक अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २०३/२०२३ भा.दं.वि. कलम ४१९, ४२०, माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















