न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- कामाचे टास्क पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला आरोपीने फिर्यादीला एक हजार रुपये भरण्यास सांगितले. ते काम पुर्ण केल्यानंतर त्याचा मोबादला म्हणुन ९०० रुपये दिले. कामाचे पैसे व सुरवातील भरलेली रक्कम परत दिली.
त्यानंतर आणखी काम देवुन त्या कामासाठी सुरुवातीला लागणारे पैसे फिर्यादीकडुन घेतले. ते काम पुर्ण केल्यानंतर आरोपीने फिर्यादीला ५,०५,३३२ रुपये परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १६ ते १८/०४/२०२३) पर्यंत फिर्यादीच्या चिखलीतील घरी घडला.
महिला फिर्यादीने येस बँकचे अंधेरी शाखेचे वेस्ट करंट खाते नंबर ००१०६३३००००४५९७ त्यांचा आयएफससीकोड नंबर YESb ० ० ० ० ० १ ० खातेदाराचे नाव सम्राट सोफा अधेरी वेस्ट मुंबई व येस बँकचे खाते नंबर ०६१४६३३००००६८२१ त्यांचा आयएफससीकोड नंबर YESb००००६१४ खातेदार नाव एसके ट्रेडर्स मोतीनगर दिल्ली यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















