न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- कन्याकुमारी ते पुणे रेल्वे प्रवासा दरम्यान फिर्यादीच्या कॅमे-याच्या काळया रंगाच्या पिशवीतील फ्युजी कंपनीचा कॅमेरा, तीन बॅटरी, चार्जर, वायर, दोन मेमरी कार्ड तसेच एक सोन्याची साखळी त्याला रुद्राक्षमाळा वजन ३० ग्रॅम अशा वस्तू अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या.
त्या वस्तूंची किंमत १,००,५०० रुपये एवढी आहे. ही घटना (दि.०५/०२/२०२३ रोजी रात्री १०.३५ ते दि. ०६/०२/२०२३ रोजी रात्री ००.३० वाजता पुणे रेल्वे स्टेशन ते राहत्या घरापर्यंतच्या प्रवासात घडली.
फिर्यादी ओमाना कुट्टन नारायनान (वय ७३ वर्षे, रा. पुर्णानगर, चिंचवड) यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी २९७ /२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















