न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- रुममेटसह फिर्यादी जेवण करण्यासाठी भुमकर चौकातील हॉटेलमध्ये पायी जात होते. दरम्यान हनुमान मंदिरासमोर आलेल्या ट्रेलरने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहनं चालवुन फिर्यादीच्या मैत्रिणीला धडक दिली. त्यामुळे ती जमिनीवर पडली.
कंटनेरचे मागील चाक तिच्या अंगावरुन गेल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक तिच्या मृत्युस कारणीभूत झाला. ही घटना (दि. ३) रोजी दु. २.३० च्या सुमारास हनुमान मंदिरासमोर, भुमकर चौक, वाकड येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी शिवशंकर जोकुराम मोरया (वय ३० वर्ष, धंदा- ड्रायव्हर, रा हरिपुर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ५८७/२०२३ भा.द.वि. कलम ३०४-४,३३८,२७९ व मो वा का कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.















