न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- साई पेट्रोल पंप, पुनावळे येथे मिटर कॅशिअर म्हणुन नाईट ड्युटीस फिर्यादी होते. दरम्यान कारवरील चालकास गाडी दुस-या बाजुने आणा असे म्हणाल्याने तो त्या ठिकाणावरुन निघुन गेला. काही वेळाने पुन्हा येवुन फिर्याला ‘तु इकडे ये तुला बघायचे काय’ असे म्हणुन लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करुन शिवीगाळ करून गंभीर जखमी केले. तसेच गाडीत बसलेल्या दुस-या इसमाने शिवीगाळ केली आहे.
हा प्रकार (दि.०३) रोजी सायंकाळी २.०० वाजता साई पेट्रोल पंप, पुनावळे येथे घडला.
फिर्यादी अविनाश नानासाहेब शिंदे (कॅशिअर, चिंचवड) यांनी आरोपी चारचाकी गाडी (एमएच१२पीक्यु८५४४) वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ५८४/२०२३ भा. दं. वि. कलम- ३२६, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















