न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- मावळ लोकसभेची निवडणूक २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी २०५ चिंचवड विधानसभा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
त्यात म्हटले आहे की, ३३ मावळ लोकसभा, २०५ चिचवड विधानसभा मतदार संघ ४ टप्यामध्ये मतदान दि. २९ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. मतदान केंद्रा ध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे १ ले प्रशिक्षण रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड या ठिकाणी दि. २३/०३/२०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता व दुपारी २.०० वाजता अशा दोन सत्रामध्ये होणार आहे.
मतदान केंद्र कर्मचारी यांना मा. निवडणूक अधिकारी यांचेकडील आदेशाचे वाटप करणेत आले असून, नियुक्त कर्मचारी यांनी उक्त प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती. मनीषा कुंभार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ३३, मावळ लोकसभा व २०५ चिंचवड विधानसभा यांनी केले. सदर प्रशिक्षणास EVM व VVPAT मशीन्सचे हातोहाती प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे या पत्रात म्हटले आहे.











