न्युज पीसीएमसी नेटवर्क
दिल्ली (दि. २१ मार्च) :- सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देशातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
याआधीच भाजपने लोकसभे सोबत होणाऱ्या काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी २० राज्यातील १८२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाचे उमेदवार :-
वाराणसी- नरेंद्र मोदी
गांधीनगर- अमित शहा
लखनऊ- राजनाथ सिंह
नागपूर- नितीन गडकरी
अमेठी- स्मृती इराणी
धुळे- सुभाष भांबरे
वर्धा – रामदास तडस
नंदूरबार – हीणा कुमार गावित
रावेल – रक्षा खडसे – रावेल
अकोला – संजय धोत्रे
गडचिरोली – अशोक महादेवराव नेते
चंद्रपूर – हंसराज गंगाराम अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिंवडी – कपिल पाटील
मुंबई नाॅर्थ – गोपाल शेट्टी
मुंबई नाॅर्थ सेंट्रल – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डाॅ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव भालेराव – श्रृंगारे
सांगली – संजयकाका पाटील
अंदमान निकोबार – विशाल जाॅली











