न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- टॉवर क्रमांक २४ व २५ मध्ये पाडलेल्या भिंतीचे काम चालु होतं. त्यावेळी तेथे आरोपी आले. नितीन कांबळे ही भिंत कोणाच्या परवानगीने बांधत आहेस असे फिर्यादीला म्हणाले. त्यावेळी सदरचे काम हे कंपनीच्या सांगण्यावरून चालु आहे, असे फिर्यादीने आरोपीला सांगितले. त्यावरून आरोपीने चिडुन फिर्यादी यांना जातीवाचक शिविगाळ केली. ‘तू गेटके बाहर मिल मै तुझे दिखाता हूँ मैं कौन हूँ’ असे म्हणुन फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. टॉवर २४ व २५ येथे बांधलेल्या भिंतीस लाथ मारून भिंत पाडली. पुन्हा फिर्यादीच्या जवळ येवून ‘तू तेरे जाती के लायकी में रहते जा, तू इस काम में ध्यान मत देना’ अशी जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास लोढा बेलमंडो सोसायटी, गहुंजे येथे घडला.
फिर्यादी नितीन चंद्रकांत कांबळे (सिक्युरीटी गार्ड) यांनी आरोपी पवन गोयल (पुर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी ११९ / २०२३ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r) (S), भादवि क. ५०४, ५०६,४२७ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















