न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- वाकडमध्ये १२ वर्षीय मुलगी एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपी हा तिच्या घरी आला. तीला शिविगाळ करुन तिच्यासमोर घाणेरडे कृत्य करुन तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
हा प्रकार (दि. ३) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडला. महिला फिर्यादीने आरोपी अक्षय प्रकाश लोंढे (वय ३५ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ४३५/२०२३ भा.द.वि. कलम ३५४(अ), ५०४, ४४२, ४४८ पोस्को अधिनियम कलम ११ १२ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.