न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- अतिक्रमण विभाग क क्षेत्रिय कार्यालयाने भारतमाता चौक मोशी ते मोईफाटा चिखली येथील ४३५ किऑक्स काढले आहेत. क व ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत संयुक्त करवाई करण्यात आली.
प्रभाग क्रमांक ८ भोसरी एमआयडीसी, इंद्रायणी नगर टेल्को रोड मराठा चेंबर्स येथे एक टपरी निष्कासन करण्यात आली. वंडर कार समोरील अनधिकृत ३ टपऱ्या जप्त करण्यात आल्या व २ टपऱ्या निष्कासन करण्यात आल्या.
















