न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- रेल्वेच्या चाकाचे चार सेट दिब्रुगड, आसाम येथे पोहचविण्यासाठी फिर्यादीने आरोपीच्या ताब्यात दिले होते. दरम्यान आरोपीने १४,०९,२९९ रुपये किंमतीचा माल कोठेतरी ठेवुन किंवा कोणाला तरी विकुण त्याचा अपहार केलेला आहे.
हा प्रकार (दि. १८/०४/२०२३ ते दि. २५/०४/२०२३) च्या सुमारास एचवायटी इंजि. कंपनी प्रा.लि, एमआयडीसी भोसरी येथे घडला.
फिर्यादी अशोक उदयनारायण सिंग (ट्रान्सपोर्ट व्यवसायिक, रा. रावेत) यांनी आरोपी रामेश्वर उखा चव्हाण (वय ४० वर्षे रा.सांगवी ता.चाळीसगाव जि.जळगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८५/२०२३ भा.द.वि. कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















