न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी (@CP_PCCity) या ट्विटर लाईव्हद्वारे आज (दि. ५) रोजी सायं ४.०० ते ५:३० च्या दरम्यान नागरिकांशी थेट संपर्क साधुन नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमास नागरिकांचा अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच २५० पेक्षा जास्त नागरीकांनी प्रश्न विचारुन ३८० पेक्षा अधिक नागरीकांनी ट्विट केले. नागरिकांनी पोलीस आयुक्तांना विविध विषयांवर प्रश्नांची विचारणा केली. नागरिकांचा उत्साह पाहुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील विचारलेल्या प्रश्नास मार्मिक व अचुक उत्तरे देवुन नागरीकांना अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला.
नागरिकांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये मुख्यतः वाहतुक, सायबर गुन्हेगारी समस्या यांचा समावेश होता. त्यातील काही महत्वाच्या ३० ते ३५ प्रश्नाची उत्तरे पोलीस आयुक्त यांनी स्वतः नागरीकांना ट्विटव्दारे दिले.
त्यातील काही प्रश्नउत्तरे खालीलप्रमाणे :-
Q1. Sir pimpari chinchwad place made kahi palces made koyta gang and gundgiri hychavr prtibandatmak upay karavi hi namra vinanti…
Reply :- मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत तसेच १३५ कुख्यात गुंडावर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशीच कडक कारवाई चालू राहील.
Q2. Sir, we dont have any video about cyber releted…coz daily cyber crime is happening…. Any Awarnesss videos….
Reply:- Noted. It is one of our KRAS. We are already doing Cyber Awareness sessions at various places. Will instruct the team to share awareness videos on twitter soon too.
Q3. https://twitter.com/nileshpborate या युजरने मला पडणारे प्रश्न (विज्ञान प्रश्न मंजुषा ) या मथळयाखाली विचारलेले ५० प्रश्न
Reply:- You have landed at the wrong handle Nilesh…..try NASA, Elon Musk or maybe..Chat GPT..
Q4. Chakan traffic condition is improved now a days. What ever measures you have taken are really good. Thank you so much sir for your initiative.
Reply: Thank you for the feedback. Credit goes to Our Chakan Traffic API Machindra Adling.
अशाप्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नास आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावे, अशी विनंती केली.
















