- वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- अल्पवयीन मुलगा मोटर सायकली चोरुन चोरीची वाहने भाटनगर पिंपरी परिसरात फिरवत असतो अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी युनिट २ पथकाकरवी भाटनगर परिसरात सापळा लावला. अॅक्टीवा मोटर सायकल घेवून फिरणा-या एका अल्पवयीन मुलास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे मिळालेल्या वाहनाबाबत सखोल चौकशी केली असता त्याने गेल्या तीन दिवसापुर्वी गेलाई चौक, पिपरी व अशोक थेटरजवळ पिंपरीगाव या परिसरातून मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली. या मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५०० / २०२३ भादवि कलम ३७९, रजिस्टर नंबर ४९९/२०२३ भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल आहे.
नागरिकांनी त्यांची वाहने नेहमी हँडल लॉक करुन सुरक्षित ठिकाणी लावावी. संशयित इसमांबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहीती कळवावी, असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, जयवंत राऊत, आतिष कुडके, शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांनी केली आहे.


















