न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- घरी असताना आरोपी पतीने फिर्यादी पत्नीच्या नकळत अश्लिल व्हिडीओ बनवून त्याची क्लिप तयार केली. फिर्यादीच्या मोबाईल वॉटस्अॅपवर पाठवून फिर्यादीला एक लाख रूपये देण्याचे धमकी देवून शिवीगाळ केली आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री ७.५३ वाजता फूगेवाडी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी अबूल फैजूल अहमद हुसेन (वय ३४ वर्षे, रा. फूगेवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ३९७/२०२३, भा.दं.वि. कलम ३५४, ३५४ (क), ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















