न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- मुंबई येथील केसमध्ये साक्ष देवू नये, तसेच फिर्यादीकडून ५ कोटी रूपये उकळण्यासाठी आरोपी १ यास ४० ते ५० इसमांसह फिर्यादीच्या मे. सरदेसाई इंजीनियरिंग प्रा.लि. कंपनीत पाठवले. आरोपींनी कंपनीतील स्टाफला दमदाटी शिवीगाळ करून काही लोकांना ऑफिमध्ये कोंडले. त्या ठिकाणचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून मे. सुरूस बिल्डकॉन प्रा.लि.च्या ऑफिसमधील काऊंटरच्या ड्राव्हरमधुन ५,००,००० रूपये काढून नेले. तसेच संत तुकाराम गार्डन जवळ फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ५ कोटी रूपयांची खंडणी मागुन शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आहे.
ही घटना (दि. २९/०४/२०२३) रोजी सकाळी १०३० ते दुपारी १३०० वा. सुमारास खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौकातील फोर्स मोटर्स मटेरियल गेटसमोर, आकुर्डी व संत तुकाराम गार्डनजवळ, प्राधीकरण, निगडी येथे घडली.
फिर्यादी दिपक भास्कर फटांगरे (रा. निगडी प्राधीकरण) यांनी आरोपी संतोष गायकवाड (रा. आकुर्डी), रविराज विकास ताकवणे (रा. निगडी प्राधीकरण), अविनाश देवकर (रा. खडी मशिन झोपडपट्टी, आकुर्डी), अनोळखी ४० – ५० इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी २९१/२०२३ भादविक ३९५ ३८५, १४३, १४७, १४९,३४२, ४४७, ४४८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.















