न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- मोशी येथे डंपरने दुचाकी चालकास आणि चिंचवड येथे दुचाकी चालकाने दुसऱ्या दुचाकीस्वारास धडक धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यु झाला आहे. याबाबत भोसरी एमआयडीसी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत दुचाकीवरुन राहत्या घरी जात असताना डंपर चालकाने फिर्यादीच्या वडीलांना पाठीमागुन धडक दिली. गंभीर जखमी करुन त्यांच्या मृत्युस करण्यास कारणीभुत झाला. हा अपघात (दि. ५) रोजी सायंकाळी ७.२० च्या सुमारास हवालदार वस्ती, वाय जंक्शन, देहु -आळंदी रोड, मोशी येथे घडला. फिर्यादी अतिन्द्र अरबिंदु मल्लीक यांनी आरोपी संजीतकुमार महेश सहानी (ड्राईव्हर, रा. नेवाळेवस्ती, चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८९/२०२३ भा.द.वि. कलम २७९,३०४ (अ) मो.व्हे. अॅक्ट कलम ११९/१७७, १८४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत मुलासह फिर्यादी यांचे काका (दि. १७/०४/२०२३) सकाळी ९.०० च्या दरम्यान चिंचवडगावं ते आकुर्डी रोडने अॅक्सेस गाडीवरून कामाला जात होते. दरम्यान कमिशनर ऑफिसच्या समोरिल डिव्हायडर जवळ आकुर्डीकडुन चिंचवड गावाकडे येणा-या लाल रंगाच्या स्कुटी चालकाने त्याची गाडी भरधाव वेगात चालवुन विरुद्ध दिशेने येउन फिर्यादीच्या काकांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी त्यांच्या मृत्यूस कारणीभुत झाला व अपघाताची माहिती न देता तेथुन निघुन गेला. फिर्यादी अब्दुल रज्जाक जहागीर पठाण (रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी आरोपी लाल रंगाची स्कुटी वरील इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २०६/२०२३ भा.दं.वि. कलम ३०४ अ. २७९, ३३७, ३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७, १८४ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















