न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सात पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शुक्रवारी (दि. ५) करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.
पोलिस आयुक्त चौबे यांनी मागील महिन्यात सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
शंकर अवताडे यांची पिंपरीतून युनिट ४ मध्ये, राम राजमाने हे बावधन वाहतूक ते पिंपरी (वरिष्ठ निरीक्षक), गणेश जवादवाड तळेगाव दाभाडे ते वाकड (वरिष्ठ निरीक्षक), सत्यवान माने वाकड ते तळेगाव (वरिष्ठ निरीक्षक), संतोष पाटील वाकड ते युनिट १, अनिल देवडे चाकण ते पिंपरी, किशोर पाटील महाळुंगे ते तळेगाव दाभाडे येथे बदली करण्यात आली आहे.
















