न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- वाकडच्या कस्पटे वस्तीतील सोसायटींच्या मधोमध पीएमआरडीएच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण केलेल्या झोपड्या पीएमआरडीए प्रशासनाने आज गुरुवारी (दि.११) हटविल्या आहेत.
वाकड येथील मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. या भूखंडाची मालकी पीएमआरडीएची. तर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका आहे.
मोकळ्या भूखंडावर झालेल्या झोपडपट्टीलगत राहत असलेल्या रहिवाशांना दररोज विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. पीएमआरडीए अधिकाऱ्यांकडून येथील झोपडपट्टीवरील कारवाई विलंब होत होता. त्यामुळे झोपडपट्टीलगत राहणारे रहिवासी आक्रमक झाले होते. येथील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमण रोखण्यासाठी सीमाभिंत बांधणे गरजेचे आहे.















