न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- चोला मंडलम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमीटेड, यरंडवणा या संस्थेचे लोन रिकव्हरी करण्यासाठी फिर्यादी एस.एस. इंजिनिअर्स फर्मच्या मालकाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचे पती आरोपी यांनी हातातील बंदुक फिर्यादीवर रोखुन धरुन ‘मी तुला आता गोळी घालुन जीवे मारुन टाकतो’ असे म्हणुन हातातील बंदुकीने भिंतीवर गोळी मारली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ११) रोजी सायंकाळी ५.४० वाजता सेक्टर नं. ६, मोशी प्राधीकरण येथे घडली. फिर्यादी अमोल बापु ठोंबरे (रा. अजंठा नगर, चिखली) यांनी आरोपी प्रशांत सुतार (रा. मोशी प्राधीकरण, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १९९/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
















