न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- आपापसात संगणमत करून काही कारण नसताना गाडीवर बसलेल्या फिर्यादीला दोघांनी दगड डोक्यात, पाठीमागील बाजुस मारुन शिवीगाळ केली. सह आरोपीने फिर्यादीला पकडुन ठेवुन आरोपीने हातातील लोखंडी चॉपरने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर तसेच डाव्या दंडावर मारुन फिर्यादीला जखमी केले.
ही घटना (दि. १०) रोजी सायं ६.४५ वा. चे सुमारास भोपळे चौक, इम्राण लॉन्ड्रीसमोर, अजंठानगर, चिंचवड येथे घडली. फिर्यादी कुणाल चंद्रसेन गायकवाड (रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी आरोपी रामा नंदु कु-हाडे (रा. अजंठानगर, चिंचवड), सुमित सुंदर राऊत (रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी २९७ / २०२३ भादंवि ३२४, ५०४, ३४ भारतीय हत्यार कायदा क. ४ (२५) तसेच महा. पो. अधिनियम क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
















