न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- दिघीतील युनियन बँकेमध्ये फिर्यादी यांचे वडील एटीएम कार्ड घेवुन पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केला परंतु पैसे निघाले नाही. त्यावेळी तिथे दोघेजण आले. त्यांनी पैसे निघत नाहीत का? असे म्हणत त्यापैकी एकाने फिर्यादीच्या वडीलांजवळील एटीएम कार्ड घेतले व आम्ही प्रयत्न करतो असे सांगितले. त्यांनी वडीलांकडील युनियन बँकेचे एटीएम कार्ड घेवुन हात चलाखी करून त्यांच्याकडील एटीएम वडीलांना दिले.
फिर्यादी यांचे एटीएम ते घेवुन गेले. एटीएमला प्रॉब्लेम असल्याने पैसे निघत नाहीत, असे आरोपीने सांगितल्यावर वडील घरी आले. त्यानंतर टप्याटप्याने आरोपींनी एटीएममधून १,९९,००० रुपये काढुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २४/१२/२०२२ रोजी सायं. ६.०० ते दि २५/१२/२०२२ च्या दरम्यान ममता चौक ते साई पार्क रोड येथे घडली.
फिर्यादी राहुल सुरेंदर शाह (रा. दिघी) यांनी आरोपी २० ते २५ वयोगटातील दोन अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २०९/२०२३ भा.द.वि. कलम ४२०,३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
















