न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- कंस्ट्रक्शनच्या साईटवर दोन लाख आठ हजार रुपयांच्या ॲल्युमीनीयमच्या ५२ सेंट्रींग प्लेट कामासाठी ठेवल्या होत्या. दरम्यान ४ अनोळखी इसमांनी त्या चोरी करुन नेल्या आहेत.
या चोरीबाबत फिर्यादी यांना त्यांच्या शेजारील प्लॉटचा वॉचमन राजु तीवारी व त्यांचे सिक्युिरीटी यांनी केल्याचा संशय आहे. ही घटना (दि. ११) रोजी पहाटे ४.०० वाजता माउंटवर्ड अॅक्सीस, मुळशी रोड, प्रांजली पाटीलनगर, बावधन ता. मुळशी जि.पुणे येथे घडली.
फिर्यादी मनोज सावरमल मीत्तल (रा. बोपोडी) यांनी आरोपी अनोळखी ४ चोरटे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ६१३/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
















