- भोजपुरी अॅक्ट्रेस व मॉडेलिंग तरुणीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- वाकड येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैधरित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली. पोलिसांनी दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढली.
दरम्यान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी (दि. ११) घटनास्थळी सापळा रचून बनावट ग्राहकाकरवी वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली. दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल येथे रुम बुक करण्यास सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी दोन मुली हॉटेलमधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्या. त्यावेळी पोलिसांनी अचानक छापा मारला. दोन मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली. दरम्यान दलाल हा जवळच आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून दोन पिडीत महिला व एक दलाल (आरोपी) यांना ताब्यात घेतले. वाकड पोलीस स्टेशन येथे गुर नं. ४६२ / २०२३ भादवि कलम ३७० (३). ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४.५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
सदरची एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचा आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे.