न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- पार्ट टाईम व्यवसायाकरीता लागणारे सुकट, बोंबिल घेण्याकरीता फिर्यादी तळेगाव दाभाडे येथे गेले होते. दरम्यान एटीएममधून पैसे काढून ज्युपिटर दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीची गाडी अडविली. त्यांना मारहाण करुन कोयत्याचा व बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीला गाडीवरून खाली ढकलून दिले. त्यांची गाडी जबरदस्तीने हिस्कावून घेवून गेले. तसेच आणखी एकाची होंडा शाईन गाडी दोन अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन नेली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी दुपारी २.०० च्या सुमारास मेहता कपड्याच्या दुकानासमोर, बाजार गल्ली, तळेगाव दाभाडे येथे घडला. फिर्यादी विनोद पंढरीनाथ चव्हाण (तळवडे, चव्हाणनगर) यांनी आरोपी चार अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २३४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४, भारतीय हत्यार कायदा ३/२५ ४/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ सह क्रिमीनल लॉ अमेन्टमेन्ट कलम ७ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.