न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध मंदिरातील दानपेटींवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत.
या आरोपींकडून चोरलेला ४१ हजार ९३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहरातील ४ मंदिरात त्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. विशाल रमेश भालेराव (वय.२७), अजय रमेश भालेराव (वय.२२, दोघेही रा.भोंग्या किराण दुकानाजवळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. खंडणी, दरोडा विरोधी पथकाच्या गुन्हे विभागाने ही कामगिरी केली आहे.
सदर कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पुरूषोत्तम चाटे, पोलीस हवालदार अजय भोसले, अशोक दुधावणे, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक उमेश पुलगम, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, सागर शेडगे, सुधीर डोळस, नितीन खेसे, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे.












