न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- सांगवी फाटा येथील निखील कन्स्ट्रक्शन ग्रुपमधील साईड ऑफिसवर (दि. ६) रोजी रात्री १०.५० च्या सुमारास फिर्यादी काम करित होते. दरम्यान त्यांच्या कंपनीमध्ये कामास असलेला आरोपी याने त्यांच्या मोबाईल नंबरवरुन फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. ‘माझ्या जवळच्या माणसाला काम का सांगितले’ असे बोलून फिर्यादीला धमकी देऊन शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपी व सह आरोपी ऑफिसवर आले. ऑफिसच्या बाहेर थांबुन फिर्यादीला शिवीगाळ केली. ‘ऑफिसच्या बाहेर ये, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी दिली. आरोपींनी हातात असलेल्या लाकडी काठीने डोक्यात, पाठणीवर, डाव्या पायावर तसेच तोंडावर काठीने, हाताने व लाथाबुक्याने फिर्यादीला मारहाण केली. त्यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले ५,००० रुपये हिसकाऊन घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी धिरज तुकाराम सानप (रा. रावेत) यांनी आरोपी अनिल पवार (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), आनंद गायकवाड (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी दोघांवर २२५/२०२३ भादवी कलम ३९४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.