न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- आयशर गाडीवरील फिर्यादीच्या ओळखीचा आरोपी बदली ड्रायव्हर याने (दि. १०) रोजी रात्री १०.४५ ते (दि. १५) सकाळी १०.०० च्या दरम्यान एचपी पेट्रोल पंप, चिंबळी फाटा, पुणे नाशिक रोड येथे गाडी पार्क केली.
त्यामधील प्लॅस्टिक दाणा एकूण १० टन ११० किलो, एकुण किंमत रुपये १०.५३.१५० आणि गाडीसह वजन १५,५९० किलो वजन, असा माल थरमॅक्स चौक, चिंचवड येथे न पोहचवता त्यातील ८४, ७५५ रुपये किमतीचा ८६० किलो वजनाचा प्लॅस्टिक दाणा व एक अॅमरॉन कंपनीची बॅटरी ही अविश्वासाने परस्पर विक्री करून फिर्यादीचा विश्वासघात केला आहे.
फिर्यादी शांताराम गोविंद जाधव (रा. संभाजीनगर – औरंगाबाद) यांनी आरोपी सचिन उत्तम राठोड (वय २५ वर्षे, रा. जालना) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ४५४/२०२३ भादवी क ४०८ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.