न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- भोसरीतील लांडगेनगर येथे (दि. १९) रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास महिलेसह एकाने बेकायदेशिररित्या १,८६,०२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला.
ज्यात ५०,०२५ रुपयांचा २ किलो १ ग्रॅम वजनाचा गांजा, ३६,००० रु. रोख रक्कम व एक लाखाचा अॅपल मोबाईल या वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
महिला आरोपी, अमर निवृत्ती जेधे (रा. लांडगेनगर, भोसरी) यांच्यावर ४३६ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (आय) (ब). २९ प्रमाणे भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.











