न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- येत्या १० जूनला आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, यासाठी शेतकरी इच्छुक असतात.
संस्थानने इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार एकूण २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात १८ अर्ज रथास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, यासाठी आहेत. तर, चार अर्ज चौघडा गाडीसाठी आहेत.
लोहगाव कलवड येथील सूरज खांदवे, वाल्हेकरवाडी- विकास जगताप, संदीप वाल्हेकर, उत्तमनगर- सागर नाणेकर, बावधन- तानाजी दगडे, नांदेडगाव- निखिल कोरडे, धायरी- संग्राम टिळेकर, चिखली- गणेश भुजबळ, हिंजवडी- जीवन जांभूळकर, उमेश साखरे, बाळकृष्ण साखरे, पिंपळे सौदागर- महेंद्र झिंजुर्डे, बबनराव काटे पाटील, गुलाबराव कुंजीर, वाघोली- कैलास सातव, वडखुर्द- ओमराजे खांदवे, भूगाव- प्रशांत शेडगे, येलवाडी- सुरेश मोरे यांनी अर्ज केले आहेत. चौघडासाठी येलवाडी येथील रोहीदास बोत्रे, जालिंदर बोत्रे, प्रशांत बोत्रे, चिंबळी- सत्यवान जैद यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली.












