न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे थोर स्वातंत्र्यसैनिक तर होतेच तसेच ते उत्तम लेखक आणि आधुनिक विचारसरणीचे मुत्सद्दी राजकारणी देखील होते, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणा करण्यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच नेहरूनगर येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास उप आयुक्त विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, प्रशासन अधिकारी सोनम देशमुख,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तर नेहरूनगर येथील कार्यक्रमास उप आयुक्त विठ्ठल जोशी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, माजी नगरसदस्य राहुल भोसले,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क प्रभागाचे प्रशासन अधिकारी डी.डी.कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय धाडगे, अनिल यादव,राजेश बनपट्टे,संतोष लष्करे आदी उपस्थित होते.
पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मानवतावादी विचारसरणीतून जगाला युध्दाऐवजी शांततेचा संदेश दिला यामुळे त्यांना शांतिदूत म्हणून संबोधण्यात येते तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी पंडित नेहरू सतत आग्रहशील असायचे असेही वाघ म्हणाले.












