न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- मित्र आणि फिर्यादीचा भाऊ हे दोघेजण झोपले होते. त्यापैकी फिर्यादीच्या भावाने मस्करीमध्ये आरोपी मित्राच्या खिशातील मोबाईल काढुन घेतला. त्यामुळे चिडलेल्या आरोपी मित्राने रागाच्या भरात फिर्यादीच्या भावाला हाताने मारहाण केली.
त्यांना खाली पाडुन डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २६) रोजी रात्री तीन वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.
फिर्यादी भगवान वसंत वाघमारे यांनी आरोपी अमर ऊर्फ एक्क्या गौतम कसबे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २२३/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान अमर ऊर्फ एक्क्या हा नेपाळ येथे पळुन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने बारा तासांच्या आत त्याला लोणावळा रेल्वे स्टेशनमधून अटक केली आहे. गंभीर जखमी झालेला फिर्यादीचा भाऊ नारायण वाघमारे हा ससुन हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान (दि. २६) रोजी मयत झाला आहे. या गुन्हयात भा.दं.वि कलम ३०२ हे वाढविण्यात आले आहे.