न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- लिगल अॅडवायझरचे काम पाहणाऱ्या फिर्यादीच्या कंपनीच्या बँक खात्यावरून मॅनेजमेन्टची चेकवर सही न घेता आरोपीने कंपनीचे डयुप्लीकेट लेझर बनवले. त्यावर टेरीमॅक इंडीया कंपनीचा शिक्का तयार केला. तो शिक्का कंपनीच्या लेझरवर मारुन चेकवर कंपनी मॅनेजमेन्टच्या डयुब्लीकेट सहया केल्या. एल्का इंटप्राईसच्या बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर करुन स्वत:च्या बँक खाते नंबरवर १,८४,४४,५०० इतकी रक्कम ट्रान्सफर करुन पैशांचा अपहर केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २/११/२०२० पासुन ०४/०५/२०२३) पर्यंत वेळोवेळी इन्वेर इलेक्ट्रोडाईन कंपनीत, एमआयडीसी भोसरी येथे घडली.
फिर्यादी अंकेत प्रदिप जैन यांनी आरोपी निलकंठ मच्छिंद्र पाटोले रा. भोसरी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २२२/२०२३ भादंवि कलम ४०६, ४२०, ४६८, ४७२, ४७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.