- पिंपळे सौदागरमधील घटना; महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२३) :- इलेक्ट्रिक डीपीला व्यवस्थित तार कंपाउंड केले नाही. तसेच इलेक्ट्रिक डीपी व्यवस्थित बंद न करता सुरक्षेची काळजी घेतली नाही. फिर्यादीची आठ वर्षीय मुलगी या इलेक्ट्रिक डि.पी.ला आसलेल्या तारेच्या कंपाउडमधुन आत गेली. उघडया इलेक्ट्रिक डीपीला हात लावल्याने तिला शॉक लागला. तिच्या उजव्या हातापासुन मानेला, छातीला, पोटाला इलेक्ट्रिक करंट लागुन भाजले आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक शौचालय जवळील इलेक्ट्रिक डिपी, जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर येथे घडला.
फिर्यादी आनंद विजयकुमार उमरजकर यांनी आरोपी सार्वजनिक शौचालय जवळ, जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर येथील इलेक्ट्रिक डिपीशी संबंधीत महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीतील पिंपळे सौदागर विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २४५/२०२३ भा.द.वि. कलम ३३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.