न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२३) :- टेक्स्ट मेसजदवारे लिंक शेअर करुन तो बँकेचा प्रतीनिधी आहे, असे आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीला फोनद्वारे भासवले. लवकरात लवकर पॅन कार्ड अपडेट करा, नाहीतर खाते बंद होईल, अस वांरवार मेसेज केला.
लिंक पाठवून त्या लिंकवर क्लिक करण्यास त्यांना प्रवृत्त केले. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीचे ८८००० रुपये व फिर्यादीचे पती यांचे ३,९०,३०० रुपये, असे एकुण ४,७८,३०० रुपयांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १/३/२०२३) रोजी सकाळी १०.३० ते १३.३० च्या दरम्यान बावधन येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी मो. क्रमांक ८९८७९०४१९२ धारक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ६५८/२०२३ भा द वि कायदा कलम ४१९, ४२० भादवि सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ क ६६ ड प्रमाणे आरोपीच्य विरोधात गुन्हा दाखल केला आहे.