न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या प्रशिक्षणार्थ्याची अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पिंपरी या कंपनीने निवड केली.
शिकाऊ उमेदवारी (Apprentice) साठी (दि. १७) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी येथील ड्राफ्टसमन मेकॅनिकल ट्रेडच्या १८ प्रशिक्षणार्थीच्या मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या. एकूण १८ प्रशिक्षणार्थीपैकी १२ प्रशिक्षणार्थीची कंपनीने निवड केली. यामुळे अंतिम परीक्षा होण्यापूर्वी व सत्र संपण्याच्या आगोदरच Apprentice च्या माध्यमातून चांगली संधी प्रप्त झाल्याने प्राचार्य शशिकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
कंपनीचे सिनीयर मॅनेजर जगदीश न्हावकर व एचआर स्पेशालिस्ट केशव सिन्हा यांचे गटनिदेशक प्रकाश घोडके यांनी आभार मानले. प्र. गटनिदेशक रविंद्र ओव्हाळ व निदेशक विक्रमसिंह काळोखे व संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी सलमान शेख यांनी प्रशिक्षणार्थ्यांना ट्रेनिंग व इंटरव्हयूब बाबत मार्गदर्शन केले.