न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२३) :- पिंपळे सौदागर येथील कुंजीर कॉलनीतील रो हाऊसला अचानक आग लागली. याबाबत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली.
अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत लागलेली आग आटोक्यात आणली. परिस्थिती नियंत्रणात असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.