- सिमेंटचा ब्लॉक मारुन आयफोन फोडला; मित्राला गंभीर मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- हातातील घडाळ्याचे सिल वॉरंटीत असल्याने ते बदलुन घेण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र दुकानात गेले होते. तेथील दुकानदाराने टाळाटाळ करुन त्यांना शिवीगाळ केली. आरोपी दुकानादराने जागा मालकाला हाक मारुन बोलावले. सह आरोपीने फिर्यादीच्या कानाखाली मारली. तेवढ्यात दुसरा सह आरोपी याने अचानक फिर्यादी यांना बांबु मारला. फिर्यादी प्रतिकार करीत असताना फिर्यादी यांच्या डाव्या हातातील आय फोन मोबाईल झटापटीमध्ये खाली पडला. आरोपीने त्या मोबाईलवर सिमेंट ब्लॉक मारुन मोबाईल फोडुन टाकला. फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात सह आरोपीचा अनोळखी मित्र याने सिमेंटचा ब्लॉक मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०/०५/२०२३) रोजी रात्री ८.३० वा. सुमा. बास्कीन रॉबिन्स समोरील घडाळ्याच्या दुकानासमोर, माऊली चौक, वाकड इथे घडला.
फिर्यादी अभिषेक अविनाश पारखी (रा. वाकड) यांनी आरोपी घड्याळ दुकानादार वर्मा (नाव पत्ता माहित नाही), ऋतिक ढसाळ, मित्र पाटील, एक अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५२४/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०६,५०४, ४२७,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.