न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- “३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिना” निमित्त पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने सर्व पोलीस स्टेशनमधील वस्ती / झोपडपट्टी भागामध्ये महिला / गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त/ प्रतिनिधी, पोलीस ठाणे स्तरावर नेमण्यात आलेले समन्वयक पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या मदतीने विशेष व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष बाल पथकाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली “३१ मे जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त” सतिश पवार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी अजमेरा कॉलनी येथे, विशेष बाल पोलीस पथक यांनी निगड़ी, चिंचवड पोलीस स्टेशनच्या समन्वयाने अजंठानगर, आनंदनगर या झोपडपट्टी भागात व पिंपरी पोलीस स्टेशन येथे तसेच चाकण, रावेत, भोसरी, आळंदी, चिखली पोलीस स्टेशन इ. ठिकाणी वस्ती / झोपडपट्टी भागात समन्वयक पोलीस अधिकारी यांनी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
या व्यसनमुक्ति कार्यक्रमासाठी विल्यम साळवी, वंदना वाघमारे विमल फाउंडेशन, डॉ. राजीव नगरकर मानसोपचार तज्ञ, मंदार शिंदे, तेरे देस होमस्, परम आनंद सचिन करंजुले होपस फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन या सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांनी एकुण ११ ठिकाणी जागतिक तंबाखु दिनाचे महत्व सांगुन तंबाखू सेवनाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परीणाम व्यायाम व आहाराचे फायदे, बाल लैंगिक अत्याचार, बालकांची सुरक्षितता, शिक्षण व व्यसनाधिनता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर माहिती देवून मार्गदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रमामध्ये एकुण ३१२ बालकांनी १६८ पालकांनी तसेच ०५ सामाजिक संस्थांचे एकुण १० प्रतिनिधी एकुण २८ वस्ती/ झोपडपट्टी समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते २६ महिला गृहीणी कमिटीमधील सदस्य २७ पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण ५७१ व्यक्तींनी सहभाग घेतला. उपस्थित सर्वांना “आपण सर्वजण राष्ट्राची संपत्ती असुन व्यसन करणार नाही” अशी शपथ देवुन प्रेरणा देण्यात आली व बालकांचा उत्साह वाढविण्यात आला.
“जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त” व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, संजय शिंदे पोलीस सहआयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त सो (गुन्हे), विशेष बाल पथकाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश पवार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोशि/कपिलेश इगवे अंमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विशेष बाल पथकाचे संपत निकम (श्रेणी पोलीस उप-निरीक्षक), मपोना / दिपाली शिर्के, पोशि/अमोल मुठे, पोशि/ भुषण लोहरे, यांनी केले.












